Home क्राईम माजी महापौर ललित कोल्हे यांचा जामीन फेटाळला

माजी महापौर ललित कोल्हे यांचा जामीन फेटाळला


जळगाव प्रतिनिधी । बांधकाम व्यावासायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला आहे.

याबाबत माहिती अशी की, १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेत फरार असलेल्या ललित कोल्हे यांना पाच महिन्यांनी २७ मे रोजी पोलिसांनी महाबळमधून अटक केली होती. कोल्हे सध्या गोदावरी महाविद्यालयात दाखल आहे. न्या. आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. सरकारतर्फे अ‍ॅड.नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.


Protected Content

Play sound