नवी दिल्ली । इराणने आपल्या महत्वाकांशी चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळले आहे. भारत व चीन दरम्याने संबंध ताणले गेले असतांना इराणचा हा पवित्रा भारताला धक्का देणारा ठरला आहे.
याबाबत वृत्त असे की, इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी चाबहारहून अफगाणिस्तान सीमेवर जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बनवण्यासंदर्भात करार झाला होता. आता इराणने हा प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास विलंब होत आहे, परिणामी आम्ही स्वत:च यावर काम करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती इराणतर्फे देण्यात आली आहे. ६२८ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग बांधण्याचं काम मागील आठवड्यात सुरु झालं आहे. इराणचे वाहतूर शहरी विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी याचं उद्घाटन केलं. हा रेल्वे मार्ग सीमा पार करुन अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जातो. हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. यासाठी आता इराणच्या राष्ट्रीय विकास निधीचा वापर केला जाईल.
दरम्यान, भारताला या प्रकल्पातून वगळण्याचा इराणचा हा निर्णय चीनधार्जिणा मानला जात आहे.