जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीत मध्यरात्री कुटुंब झोपले असतांना दोन तरूण घरात शिरून महिलेल्या अंगावरील सोन्याची पोत तोडून पळ काढला होता. मात्र कुटुंबातील प्रसंगावधाने दोन्ही चोरट्यांना पकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार माहिती अशी की, राजेंद्र शांताराम पाटील (वय-३२) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हे आईवडील, भाऊ, पत्नी व मुलांसह राहतात. १३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण घरात झोपलेले असतांना त्यांची मुलगी दिव्याचा रडण्याचा आवाज आला. राजेंद्र पाटील हे मुलीच्या रडण्याच्या आवाजाने जागी झाले. त्याचवेळी १८ ते २० वर्षांचा मुलगा घरातून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यांनी राजेंद्र पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत तोडली आणि पोतमधील सोन्याचे डोरले व मणी चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पुन्हा पाटील यांनी भावासह पुन्हा पाठलाग केला असता राज शाळेजवळ दोघे मुलींची चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांची अंगझाडाझडती घेतली असता सोन्याचे डोरले मिळून आले. गौरव रविंद्र खरे रा. मंगलपूरी रामेश्वर कॉलनी आणि गौरव जगन साळुंखे रा. अशोक किराणा दुकान हे संशयित चोरट्यांची नावे आहे. दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.