Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण


चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध जातीच्या वृक्षांची लागवड केली.

वृक्ष प्रत्येकाने जबाबदारी घेऊन जगवावे, असे यावेळी मंगेश चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांशी बोलताना सांगितले. तसेच नीरज पाटील या विद्यार्थ्यांचा आज असलेला वाढदिवस त्याच्याहस्ते वृक्ष लावून साजरा करण्यात आला. पुढील वर्षी या वृक्षाचा वाढदिवस व नीरजचा वाढदिवस सोबत साजरा करू असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

याप्रसंगी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, ॲड. राजेंद्र सोनवणे, सुदाम त्रिमाळी, संदीप पाटील, मनोज निकम, हिलाल बोरसे, डी.आर. सूर्यवंशी, राजेंद्र बोरसे, दामोदर माळी, गोकुळ माळी, हिम्मत अहिरराव, अविनाश घुगे, मनोज निकम, ज्ञानेश्वर गोसावी, दीपक जगताप, भालचंद्र देसले हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound