राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे होम क्वारंटाईन !

मुंबई (वृत्तसंस्था) संपर्कात आलेले दोन नेते कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. कोल्हे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

 

 

अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना, अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे. मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Protected Content