रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील उटखेडा येथील शेतकऱ्याच्या शेताच्या बांदावरून केळीचे कंद अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरूषोत्तम भागवत पाटील (वय-६५) रा. उटखेडा ता.रावेर यांनी त्यांच्या शेतात लावण्यासाठी केळी पीकाचे ६०० कंद बांधावर ठेवले होते. त्यांच्या गावातील संशयित आरोपी टोपलु बळीराम तायडे (वय-६५) रा. उटखेडा ता. रावेर याने चोरून नेले. याबाबत पुरूषोत्तम पाटील यांनी चोरलेल्या कंदाची विचारणा केली असता संशयित आरोपीने शिवीगाळ केली व जातीवाचक शिवीगाळ केली याप्रकरणी गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. पुरूषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी टोपलु तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करताच संशयित आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनानुसार पीएसआय मनोज वाघमारे, हेकॉ जितेंद्र पाटील यांनी केली आहे.