लॉकडाऊनच्या काळात ५२० सायबर गुन्हे दाखल, २७३ लोकांना अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ५२० गुन्हे दाखल झाले असून २७३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५२० गुन्ह्यांची (ज्यापैकी ४० N.C आहेत) नोंद ४ जुलै २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २१८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ११ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, Youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ६१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

पुणे ग्रामीण

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या विभागात नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ४६ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या भावना दुखावतील अशा आशयाचा राजकीय मजकूर असणारी पोस्ट फेसबुक प्रोफाईल वर शेअर केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

कोणत्याही खोट्या मोहात फसू नका

सध्याच्या काळात बरेच व्हाटसअँप मेसेजेस फिरत आहेत .या मेसेजेस मध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी,किंवा कोणत्याही वेबसेरीजचे subscription स्वस्तात आहे ,खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो व एक लिंक दिली असते . आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये .कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे. तुम्ही जर त्या लिंकवर क्लीक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स,पासवर्डस ,डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती ,पिन क्रमांक सर्व विचारले जाते . तुम्ही ही सर्व माहिती दिली कि, एक OTP येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो .पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो OTP, तुमच्याकडून काढून घेते व काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा sms येतो कि तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये .तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) पण नोंद करावी. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका. असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Protected Content