Home आरोग्य पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

0
32


पुणे (वृत्तसंस्था) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील तब्बल ८ सदस्यांनाही करोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यात आज त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण ९ जणांना कोरोना झाला आहे. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोनाची टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असे ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल (शनिवारी) केले होते.


Protected Content

Play sound