गळा चिरून हत्येनंतर महिलेवर बलात्कार ; विकृत आरोपीला अटक

नालासोपारा (वृत्तसंस्था) येथील ३० वर्षीय दुकानदाराने महिलेची गळा चिरून हत्या केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी विकृत आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एक ३२ वर्षीय महिला बाजारात खरेदीसाठी घराबाहेर गेली होती. ती एका खेळण्यांच्या दुकानात गेली होती. तिथे कशावरून दुकानदाराशी बाचाबाची झाली आणि वाद वाढला. त्यातूनच दुकानदाराने महिलेची हत्या केली. हत्येनंतर या विकृताने महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून फेकून दिला. ओळखून क्राइम ब्रॅंचने महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात केली. थोड्याच दिवसात पोलिसांचे पथक आरोपी दुकानदारापर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. विकृत आरोपीने आपण महिलेची हत्या केल्यानंतर बलात्कार केला, अशी कबुली दिली आहे.

Protected Content