Home आरोग्य पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन


पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन झाले. 25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

 

नगरसेवक दत्ता साने हे मागील दहा दिवसापासून कोरोनाशी मुकाबला करत होते. परंतू आज (4 जुलै) सकाळी मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. सानेंना सुरुवातीला कोरोनाची अगदी कमी प्रमाणात लक्षणं आढळत होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यासह जिल्ह्यातील इतर भागात सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, साने हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते निकटवर्तीय मानले जायचे.


Protected Content

Play sound