Home क्राईम जळगावात कारची वीज खांबला धडक; दोन जखमी

जळगावात कारची वीज खांबला धडक; दोन जखमी

0
35


जळगाव प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद महामार्गावर अजिंठा रोडवरील राका फर्निचर जवळील एलटी लाईन वीज पोलला भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने चारचाकीतील दोन जण जखमी झाले.

बुधवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. औरंगबादकडे जाणाऱ्या चारचाकी (एमएच- ०२, बीजी- ३०७८) गाडीवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी रेमंड स्ट्रिट लाइट लोखंडी एलटी पोलला धडकली. यात चारचाकीने चारवेळा पलटी घेतली. चालक ज्ञानेश्वर एम. चव्हाण (वय २० सुप्रीम कॉलनी) व प्रशांत प्रकाश नायर (वय २३ अयोध्यानगर) हे दोन्ही जखमी झाले.


Protected Content

Play sound