नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या कोरोनिल कीटच्या विक्रीस सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता संपूर्ण देशभरात हे किट उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा बाबा रामदेव यांनी केली आहे.
बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद सांगितले की, आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिव्य कोरोनिल टॅबलेट, दिव्य श्वासारी वटी आणि दिव्य अणु तेल यावर आता प्रतिबंध नाही. याला स्टेट लायसेन्स अथॉरिटी, आयुर्वेद-युनानी सर्व्हिसेस आणि उत्तराखंड सरकारमार्फत उत्पादन आणि वितरणाची पतंजलीला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण भारतात हे किट उपलब्ध करू शकतो.आम्ही आयुर्वेदिक औषधांचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पहिले यशस्वी क्लिनिकल कंट्रोल ट्रायल केले आता आम्ही मल्टिसेंट्रिक क्लिनिकल ट्रायल करणार असल्याचेही रामदेव बाबा यांनी सांगितले.