जळगाव । भरधाव वेगाने येणार्या ट्रकने पुढे चालणार्या दुचाकीला जोरदार धडक देवून फरार झालेला आरोपीला धौलपूर (राजस्थान) येथून पकडण्यात जळगाव पोलीसांना यश आले. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत महिती अशी की, 1 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खेडीगावाजवळ हॉटेल गौरव समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मोटरसायकल क्रमांक (एमएच 19 एव्ही 7049) या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात मोटरसायकलस्वार श्रीराम उत्तम पाटील रा. खेडी खडके ता.एरंडोल जि.जळगाव यांना गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक हा ट्रकसह फरार झाला होता. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी पो.कॉ.देविदास सूरदास यांनी माहिती काढून अपघात करणाऱ्या मालट्रक नंबर (आरजे 11 जीबी 227) असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सदर मालक-चालक बाबत माहिती काढून आरोपीचे नावा रामदास गोरेलाल गुजर असल्याचे निष्पण्ण झाले. त्यानुसार आरोपी रा.उलावाडी ता. वाडी जि.धौलपूर (राजस्थान) येथे राहत असल्याचे समजता एमआयडीसी पोलिस पथकातील कॉ.देविदास सूरदास, पो.ना. भास्कर ठाकरे यांनी धौलपुर राजस्थान येथे जाऊन ट्रक चालकास ताब्यात घेतले.