जळगाव प्रतिनिधी । गोठ्यात गोऱ्हा बांधल्याच्या संशयावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना शहरातील सिटी कॉलनीमध्ये शनिवारी रात्री ९ वाजता घडली. हाणामारीत दोन्ही गटातील जखमी झाले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविदास शंकर सोनवणे (४७, रा़ सिध्दीविनायक पार्क) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी दुपारी सोनवणे यांच्याकडे असलेला काळ्या रंगाचा गोºहा हा दोर तोडून कुठतरी निघून गेला़ त्यांनी दुपारी त्याचा गावात शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. तेवढ्यात गल्लीत राहणारा पवन सोनवणे याने सांगितले की, तुमचा गोऱ्हा हा सिटी कॉलनीतील समशेर भंगारवाला यांच्याकडे बांधलेला आहे. देविदास यांनी लागलीच समशेर याच्या घरी जावून तु माझा गोºहा का बांधला अशी विचारणा केली. त्यातच समेशर याचे दोन्ही मुलं त्याठिकाणी आले व त्यांनी देविदास यांना हॉकीस्टीक आणि गॅसच्या नळीने पाठीवर आणि पायावर मारहाण केली. वडील देविदास यांना मारहाण होत असल्याचे कळताच त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या शुभम, पंकज आणि धिरज या तिन्ही मुलांवर समशेर याच्या मुलांसह पत्नी व भाच्याने दगडफेक केली. त्यात शुभमच्या डोळ्याजवळ दुखापत झाली़ याप्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी देविदास यांच्या फिर्यादीवरून समेशर खान घासी खान (४०, रा. सिटी कॉलनी) यांच्यासह दोन मुलांसह पत्नी, भाऊ व भाचा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लाठीने मारहाण करून केली सामानाची नासधूस
समशेर खान यांच्या फिर्यादीवरू, शनिवारी रात्री देविदास उर्फ संतोष सोनवणे हा समशेर खान यांच्या घरी आला़ माझा गोऱ्हा तुझाकडे आहे. त्यावर समशेर याने गोठ्यात जावून पाहणी करून घे असे सांगितले़ पाहणी करून आल्यावर गो-हा तेथे नव्हता़ परंतु, तुझ्याकडे तो असल्याचे म्हणत देविदास याने शिविगाळ करण्यास सुरूवात केली. नंतर शुभम, पंकज, धिरज या तिन्ही मुलांसह दोन जणांना बोलवून देविदास याने समशेर याच्यासह त्याच्या मुलांना व पत्नीस लाठीकाठीने मारहाण केली. घरातील साहित्याचीही नासधूस केली. याप्रकरणी समशेर खान यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात देविदास सोनवणे, शुभम सोनवणे, धिरज सोनवणे व अन्य दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.