Home आरोग्य महापालिकेत होणार युनानी डॉक्टर्सची भरती-आयुक्तांचे आश्‍वासन

महापालिकेत होणार युनानी डॉक्टर्सची भरती-आयुक्तांचे आश्‍वासन

0
27


जळगाव प्रतिनिधी । जळगाव महपालिकेत लवकरच युनानी डॉक्टर्सची भरती करणार असल्याची ग्वाही आज आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी कोविड केअर युनिटच्या शिष्टमंडळाला दिली.

जळगाव शहरात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण व वैद्यकीय शिबीर मध्ये बीयूएमएस डॉक्टर हे स्वेच्छेने काम करीत असल्याने त्यांना सुद्धा शासना मध्ये सेवेची संधी द्या अशी मागणी जळगांव कोविड केअर युनिट तर्फे हाजी गफ्फार मलिक यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्ट मंडळाने केली. यात फारूक शेख तसेच डॉ जावेद शेख व अनिस शाह यांचा समावेश होता.
याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अत्यंत सकारात्मक निर्णय घेऊन पुढील आठवड्यात पुनःश्‍च जाहिरात काढून त्यात बीयूएमएस डॉक्टर्सचा समावेश ककरण्याचे आश्‍वासन दिले.

दरम्यान, जळगाव शहर कोरोना चा हॉट स्पॉट न होण्यासाठी शहरातील विविध मोहल्ला व वॉर्डातून मागणी होत असल्याने जळगाव कोविड केअर युनिट ने ही जवाबदारी स्वीकारली असुन मनपा ने सुद्धा यात सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.


Protected Content

Play sound