जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात ११७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात एकट्या जळगाव शहरात ५४ तर भडगावच्या २१ रूग्णांचा समावेश आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ११७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५४ रुग्ण जळगाव शहरात, तर त्या खालोखाल भडगावला २१ रुग्ण आढळले आहेत. जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ६, अमळनेर ४, चोपडा ३, धरणगाव १, यावल १०, एरंडोल १, जामनेर २, रावेर ८, पारोळा ४ यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे
जळगाव शहर ६०६, ग्रामीण ९५, भुसावळ ३९०, अमळनेर २८५, चोपडा २१३, पाचोरा ७४, भडगाव १६३, धरणगाव १२६, यावल १४३, एरंडोल १०७, जामनेर १४८, रावेर २१५, पारोळा २१०, चाळीसगाव ३३, मुक्ताईनगर २५, बोदवड ३८, इतर जिल्हे १०, जिल्ह्यांव्यतिरिक्त ९० असे एकूण २ हजार ९७१ अशी आकडेवारी आहे.