Home Cities जळगाव गुरुवर्य परशूराम विठोबा पाटील विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटप

गुरुवर्य परशूराम विठोबा पाटील विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटप

0
43


जळगाव प्रतिनिधी । गुरुवर्य परशूराम विठोबा पाटील विद्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी पालकांना शाळा बंद शिक्षण चालू या मोहिमे अंतर्गत ऑनलाईन अभ्यासाबद्दल माहिती सांगत त्यांना आपल्या पाल्याच्या स्वास्थ्याच्या संबंधी खबरदारी ठेवण्याचे मार्गदर्शन केले.ऑनलाईन अभ्यासासाठी प्रत्येक वर्गाचे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले असून त्यात दररोज विद्यार्थ्यांना गृहपाठ टाकला जाणार असल्याचे सांगितले. पालकांनी या प्रसंगी सोशल डीस्टेसिंगचे पालन करीत पुस्तके घेतली. प्रसंगी केसीई सोसायटी चे शालेय शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे, चंद्रकांत भंडारी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound