सोन्याच्या दराने गाठली ऐतिहासिक उंची !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज सोन्याच्या दराने ५०,००० चा आकडा पार केला असून दिल्लींध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ५०४०५ रुपयांवर गेली आहे.

सोन्याची किंमत पुढील एक-दोन महिन्यांत ५१,००० च्या आसपास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एवढी मोठी वाढ ही भारतीय रुपया आणि डॉलरच्या किंमतीवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेसह अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या किंमतीमध्ये अस्थिरता दिसू लागल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे बोलले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा मार्ग पत्करला असून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिल्लीमध्ये काही दिवसांत सोन्याचा दर ५१ हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असल्याने गुंतवणूकदार सोन्याच्या खरेदीकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये आगामी काही दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Protected Content