Home आरोग्य रावेर तहसिलदारांचा ‘कोरोना वीर’ पुरस्काराने सन्मान

रावेर तहसिलदारांचा ‘कोरोना वीर’ पुरस्काराने सन्मान

0
54
usharani devgune tahsildar raver

रावेर, प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या योद्धयांना सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘कोरोना वीर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यात रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगणे यांना देखील गौरवण्यात आले.

मागील महिन्यापासून आपलं कुटुंब, संसार सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, नागरिकांसाठी प्रबोधन, बाधितांना वेळेवर अचूक योग्य उपचार यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करून रात्रंदिवस झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सावदा येथील जफर लॉन येथे करण्यात आला. यामध्ये रावेर तहसिलदार उषाराणी देवगणे यांचा कोरोना वीर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज होते. या कार्यक्रमात ‘मानवसेवा परमो धर्मः’ ही हाजी शब्बीर हुसेन हाजी अखतर हुसेन उर्फ बाबू शेठ यांच्या कार्यावर आधारित चित्रफितीचे उद्घाटन देखिल यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound