मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने इंधनातील दरवाढीवरून आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमिवर, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टिका केली आहे. यासाठी त्यांनी भाजपने आधी लावलेल्या एका होर्डींगच्या छायाचित्राचा आधार घेतला आहे. यात इंधन दरवाढीवरून मोदी हे तत्कालीन केंद्र सरकारवर टीका करतांना नमूद करण्यात आले आहे. हे होर्डींग विसरले असाल तर आपल्या लक्षात आणून देतो असे या छायाचित्रासोबत म्हटलेले आहे.
दरम्यान, आज देखील पेट्रोल व डिझेल यांचे दर वाढल्याने देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर न्यूनतम पातळीवर असतांना भारतात मात्र दरवाढ करण्यात आल्याने यामुळे महागाई कडाडण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे.
आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले
पेट्रोल १७ पैसे ते २० पैसे तर डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर ७७.४९ रुपयेही होर्डींग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती
विसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हंटल pic.twitter.com/n6573ZS0n3
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 24, 2020