Home Cities एरंडोल खडके बुद्रुक येथील बालगृहात योग दिन साजरा

खडके बुद्रुक येथील बालगृहात योग दिन साजरा

0
61

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील तळई येथील कै.यशवंत बळीराम पाटील शि.प्र.मंडळ तळई संचलित अनाथ , निराधार, निराश्रीत मुलांचे आणि मुलींचे बालगृह खडके बुद्रुक या संस्थेत फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

अधिक्षक मधुकर कपाटे आणि प्रमोद पाटील यांनी योगाविषयक मार्गदर्शन करतांना अनेक व्याधिंपासुन व औषधींपासुन दुर रहायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही असे सांगितले आणि अंतरराष्ट्रीय योगादिनाच्या शुभेच्छा दिल्या. नंतर बालकांनी योगासन केली. या कार्यक्रमासाठी मैत्रीसेवा फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातुन सुरु केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत सर्व बालकांची नोंदणी करण्यात आली असुन त्याकामी संस्थेचे अध्यक्ष सागर महाजन,उपाध्यक्ष पियुष चौधरी,सचिव पंकज पाटील,तुषार महाजन यांनी मोलाची मदत केली असुन त्यांच्या माध्यमातुन सर्व बालकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिक्षक मधुकर कपाटे ,प्रमोद पाटील, गणेश पंडीत, अरुणा पंडीत यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound