Home आरोग्य आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनतर्फे होमिओपॅथी औषधींचे मोफत वाटप

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनतर्फे होमिओपॅथी औषधींचे मोफत वाटप

0
50


एरंडोल प्रतिनिधी । येथील वार्ड क्रमांक १२ मध्ये आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटीलआणि त्यांची आई सौ सरोज पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर गरीब व गरजू लोकांना आर्सेनिक अल्बम ३० च्या होमिओपॅथिक गोळ्या मोफत वाटप करण्यात आल्या.

कोरोना विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून हे औषध सर्वत्र वाटप केले जात आहे याच पार्श्‍वभूमीवर प्रभागातील भवानीनगर या परिसरातील नागरिकांना या गोळ्या वाटप करण्यात आल्या. आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याण चे संचालक जितेंद्र पाटील हे एरंडोल चे रहिवासी असून कल्याणला सेवा देत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर आपल्या जन्मभूमीत आपला हातभार लागावा या हेतूने मोफत गोळ्या वाटपाचा कार्यक्रम करत आहेत. जितेंद्र पाटील यांनी तालुक्यातील विविध गावांना मोफत गोळ्या वाटप करण्यात यावे यासाठी नागरिक जितेंद्र पाटील यांच्यासी संपर्क साधत आहेत.


Protected Content

Play sound