जळगाव, प्रतिनिधी । सोमवारी चीनच्या हल्ल्यात भारतीय जवान शाहिद झाले आहेत. चीनच्या या कृत्याचा आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे चीनचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे भारतीय जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २२ भरतीय जवान झाले आहेत. याचा निषेध स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व चीनचा राष्ट्रध्वज जाळून करण्यात आला. याप्रसांगी चीन हा आर्थिकदृष्ट्या कंबर मोडायचे असेल तर सर्व भारतियांनी चिनीवस्तूंवर बहिष्कार टाकावा असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार यांनी केले आहे. याप्रसंगी बजरंग दल जिल्हा संयोजक राकेश लोहार, विश्व हिंदू परिषद प्रचार प्रसिद्धीप्रमुख महेश अंबिकार, विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरीश कोल्हे, विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री दीपक दाभाडे,बजरंग दल महानगर संयोजक समाधान पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/599605297333694/