मुझफरपूर (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी अभिनेता सलमान खान, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाली आणि एकता कपूर यांच्या विरोधात पोलिसात बिहारमधील मुझफरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड.सुधीर कुमार ओझा यांनी ही तक्रार दिली आहे.
यासंदर्भात एएनआयशी बोलताना सुधीर यांनी सांगीतले की, सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढण्यात आले आणि काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले’ असा आरोप त्यांनी केला आहे. सुधीर यांनी आठ कलाकारांविरोधात तक्रार दिली आहे. त्यामध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भंसाली, एकता कपूर आणि बॉलिवूडमधील इतर लोकांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी, १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.