Home राजकीय वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : नरेंद्र मोदी

वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : नरेंद्र मोदी

0
35
Narendra Modi Indian elections 2019 Modi Narendra Modi news 938x450


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचे वीर जवान लढता लढता शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारत जशास तसे उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले आहे.

 

चीनविरोधात गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला रोखठोक इशारा दिला. नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, भारतीय जवानांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपली क्षमता सिद्ध केली आहे. विक्रम आणि शौर्य आपल्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे. भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा विश्वास मला देशवासियांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. यासाठी त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. पण आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे हे देखील भारत जाणतो असेही मोदी म्हणाले.


Protected Content

Play sound