चोपड्यात स्व.हरीभाऊ जावळेंना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रध्दांजली; यावल येथे उद्या शोकसभेचे आयोजन

चोपडा/यावल प्रतिनिधी । माजी आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांचे मंगळवारी अकाली निधन झाले. येथील भाजपा कार्यालयात आज सकाळी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी यांच्यातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर यावल येथील कृउबा समितीच्या सभेत उद्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी भाजपा माजी पं.स. सभापती आत्माराम म्हाळके, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, नगरसेवक गजेंद्र जैसवाल, शिवसेना माजी आमदार कैलास पाटील, देवेंद्र सोनवणे, मनोहर पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, भाजपा राज्यस्तरीय परिषद सदस्य मगन बाविस्कर, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील, माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष देवाबापू पाटील, शेतकी संघ संचालक हिंमत पाटील, राष्ट्रवादी पक्षातर्फे कृउबा सभापती नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय कानडे, मनसेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल वानखेडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक राजेश पाटील, तालुका संघ चालक डॉ. मनोज साळुंखे, शहर संघ चालक मनोज विसावे, काँग्रेसचे अध्यक्ष के.डी.चौधरी, तापी सह सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, श्रीकांत नेवे, भाजपा सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनिल सोनगिरे, व्यापारी आघाडी प्रमुख हेमंत जोहरी, उपाध्यक्ष दीपक लोहाणा, प्रसिध्दी प्रमुख यशवंत जडे, कार्यलय मंत्री मोहित भावे, पप्पू सोनार, जीवन पाटील, यांनी स्व. हरिभाऊ जावळें च्या प्रतिमेस हार व पुष्प अर्पण केले. कार्यक्रमास शहर व तालुक्यातून स्व. हरिभाऊ जावळे यांच्यावर प्रेम करणारे बरेच नागरिक उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली होती.

यावल कृउबा समिती शोकसभाचे आयोजन
यावल रावेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अग्रस्थानी ठेवुन जडणघडणी हरीभाऊचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाबद्दल संपुर्ण यावल व रावेर तालुका शोकमग्न झालेला आहे. त्यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली म्हणून उद्या गुरूवार १८ जून रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात श्रद्धांजलीपर शोकमग्न सभा आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करून तोंडाला मास्क अथवा रूमाल बांधुन सोशल डिस्टंसिंग पाडून सभेला उपस्थिती द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, आरपीआयचे अरुण गजरे, मनसेचे चेतन अढळकर व आदी पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content