Home क्राईम कारगाव तांडा येथे झोपेत पत्नीचा निर्घृण खून; पती अटकेत

कारगाव तांडा येथे झोपेत पत्नीचा निर्घृण खून; पती अटकेत


चाळीसगाव प्रतिनिधी । नांदावयास येत नसलेल्या पत्नीला माहेरी जावून मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील कारगाव तांडा येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पती युवराज कपूरचंद जाधव आणि कविता युवराज जाधव (वय-४५) दोघे रा. पिंपरखेड ता.चाळीसगाव येथील पती पत्नी असून त्यांनी तीन अपत्ये आहे. पतीला न सांगता कविता जाधव ही विवाहिता तालुक्यातील करगाव तांडे क्रमांक ४ येथे माहेरी गेल्या तीन महिन्यांपासून राहत होती. पत्नी करगाव येथे राहत असल्याची माहिती युवराज जाधवला माहिती मिळाली. मंगळवार १६ जून रोजीच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास करगाव येथे येवून पत्नी कविता झोपेत असतांना हल्ला चढविला व धारदार सुरीने वार करून खून केला. खून केल्यानंतर संशयित आरोपी युवराज याने आपला स्वत:च्या पायाला दुखापत केली. दरम्यान विवाहिता ही पतीसोबत नांदावयास जात नसल्याचे माहिती परिसरातून मिळत होती.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाव घेतली असून संशयित आरोपी युवराज जाधव याला ताब्यात घेतले. जखमी असल्याने त्याला धुळे येथे शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दाम्पत्याला २५ व २२ वर्षांच्या दोन मुली तर १८ वर्षाचा मुलगा आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी युवराज जाधव याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound