जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्याचे शिल्पकार, माजी शिक्षण व महसूलमंत्री , माजी विधानसभाध्यक्ष बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त त्यांना विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
खिरोदा येथे विविध शिक्षण संस्था ,फैजपूर येथील मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, डी. एन. कॉलेज तसेच लेवा समाज मंडळ, लेवा गणबोली साहित्य मंडळ आदी संस्थेतर्फे कार्यक्रम झाला. फैजपूर येथील कार्यक्रमप्रसंगी आमदार शिरीष चौधरी , प्राचार्य पी.आर.चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्राचार्य आर. सी. चौधरी, प्राचार्या अरुणा चौधरी, धनंजय शिरीष चौधरी, कन्या ,यज्ञा पाटील, डॉ.प्रभात चौधरी, के.आर.चौधरी, एम. टी. फिरके, लिलाधर विश्वनाथ चौधरी यासह अनेकांची उपस्थिती होती. तर जळगाव येथे साहित्य मंडळाच्या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव तुषार वाघुळदे , नेहा वाघुळदे , लिलाधार कोल्हे , सुधीर पाटील , प्रेम खडसे , लीना पाटील आदी उपस्थित होते. कै. चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
जळगाव जिल्ह्याचा विकास, जन मानसातील व्यक्ती, हिंदीला राष्ट्रभाषेचा मान मिळवून देणारे राष्ट्रभक्त तर होतेच, पण संपूर्ण महाराष्ट्राला सुशिक्षित करण्यासाठी शिक्षकांची फौज निर्माण करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. बालभारतीची निर्मिती तसेच जळगावला आकाशवाणी केंद्र यासह विविध धरणांची निर्मिती करून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न करून त्यास यशही आले, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्यात.