Home क्राईम माजी जि.प. सदस्याने तलवारीने कापला केक !

माजी जि.प. सदस्याने तलवारीने कापला केक !

0
29

चोपडा प्रतिनिधी । वर्डी-गोरगावले गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय दत्तात्रय पाटील यांनी लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून वाढदिवस साजरा करतांना चक्क तलवारीने केक कापल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, वर्डी-गोरगावले गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय दत्तात्रय पाटील उर्फ बाळासाहेब यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. यानिमित्त गावात चक्क मंडप टाकून जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विजय पाटील यांनी तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे. लॉकडाऊनमध्ये कोणताही सार्वजनीक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी आहे. यातच येथे आलेल्यांनी फिजीकल डिस्टन्सींगचे कोणतेही पालन केले नाही. तर तलवारीने केक कापणे हा प्रकार देखील गुन्ह्यात मोडत असून अशा प्रकरणी आधी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, विजय पाटील यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Protected Content

Play sound