रेडक्रॉस सोसायटीची मोबाईल व्हॅनची काच तोडून बॅटरी लंपास करण्याचा प्रयत्न (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेडक्रॉस सोसायटीची मोबाईल व्हॅनची काच तोडून आतून बॅटरी लंपास करण्याचा प्रयत्न मध्यरात्री घडला. मात्र बी.जे.मार्केट परिसरातील नागरीकांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव उधळला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील न्यू बी.जे. मार्केट परीसरात असलेल्या इंडीयन रेडक्रॉस सोसायटीची मोबाईल व्हॅन क्रमांक (एमएच १९ झेड ३३०८) ही गाडी ऑफीससमोर सोमवारी रात्री लावली होती. मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी मोबाइल व्हॅनची काच उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र उघडत नसल्याचे पाहून त्यांनी दोन किलो वजनाचा दागडाने काचा फोडल्या. व्हॅनमध्ये आत प्रवेश करत ड्रायव्हर कॅबीनमध्ये ठेवलेले २० हजार रूपये किंमतीच्या इनव्हर्टरच्या दोन बॅटऱ्या चोरून नेण्याचा प्रयत्नात असतांना बी.जे.मार्केट परिसरात बेघर असलेले नागरीक झोपलेले असतांना काच फुटण्याचा आवाज आल्याने जागी झाले. दरम्यान दोन चोरटे बॅटरी चोरी करत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धाव घेतली. नागरीक येत असल्याचे लक्षात येताच हातातील दोन्ही बॅटऱ्या खाली सोडून चोरट्यांनी पळ काढला. यात एक बॅटरी पुर्णपणे फुटून नुकसान झाले तर दुसरी बॅटरी चांगल्या स्थितीत आढळली. आज सकाळी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आलीअसून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार देण्यात आले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/594575461459334/

Protected Content