लॉकडाऊन शिथिल होताच तीसऱ्या दिवसी पेट्रोल व डिझेलची दरवाढ

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाला होती. त्यांतर आज पुन्हा एकदा दरवाढ करून पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे.

मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ केली. यानंतर मुंबईतील पेट्रोलचा दर ८०.०१ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ६९.९२ रुपये प्रति लीटर झाला. तर दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर वाढून ७३ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ७१.१७ रुपये प्रति लीटर इतका झाला आहे.

यापूर्वी काही राज्य सरकारानी महसूलात वाढ करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरी वॅट अथवा सेसच्या दरात बदल केल्यानं गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर मे महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोलवरी उत्पादन शुल्क वाढून २२.९८ रूपये प्रति लीटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून १८.८३ रूपये प्रति लीटर करण्यात आले होते. उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्यानं कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा मिळाला नव्हता. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कच्च्या तेलाच्या होणाऱ्या दरातील बदलांवर निश्चित केले जातात.

Protected Content