वादळात पिकांचे नुकसान; भरपाई देण्यासाठी निवेदन

WhatsApp Image 2019 02 27 at 3.09.39 PM

एरंडोल । मोठ्या वेगाने आलेल्या वादळामुळे तालुक्यातील उत्राण आणि इतर परसरातील शेतातील नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेने पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 26 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान प्रचंड वेगाने वादळ सुटले होते. तालुक्यातील उत्राण, हनुमंतखेडा, ताडे, ब्राम्हणे, तळई आणि भातेखेडा या परीसरातील शेतीजमीनवर लिंबू व दादर (ज्वारी) या पिंकाची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी रोजी आलेल्या वादळामुळे लिबू व दादर पिंकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एप्रिल व मे मध्ये तयार होणार लिंबूचेही अधिक नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतक र्‍ यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

 

यांची होती उपस्थिती
पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन, माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, उत्राणचे उपसरपंच विनोद महाजन, माजी सरपंच राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव, संतोष कोळी, आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेले गोविंद महाजन, संजय महाजन, मनोज महाजन आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Add Comment

Protected Content