Home आरोग्य यावल तालुक्यातील नेत्याला कोरोनाची बाधा

यावल तालुक्यातील नेत्याला कोरोनाची बाधा

0
30

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तालुक्यातील एका नेत्याला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त असून त्यांना आज सायंकाळी उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फैजपूर येथील पोलीस अधिकार्‍यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पाठोपाठ तालुक्यातील एका नेत्यालाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज सायंकाळी त्यांना उपचारासाठी गणपती हॉस्पीटलमधील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधीत नेत्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची बातमी तालुक्यात पसरताच ते लवकर बरे होऊन येतील असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. सज्जन व सालस स्वभावाचे हे राजकारणी लवकरच कोरोनावर मात करतील अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.


Protected Content

Play sound