Home आरोग्य एरंडोल येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या पत्नीलाही बाधा

एरंडोल येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या पत्नीलाही बाधा

0
31

एरंडोल प्रतिनिधी । येथे आधी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या व्यक्तीच्या पत्नीला आज या विषाणूची बाधा झाल्याचे आजच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे.

एरंडोल शहरातील मोरणकर गल्ली येथील ३० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. संबंधीत महिलेचा पती देखील दि.२९ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर जळगाव येथे इलाज सुरु आहेत तसेच याच दिवशी या महिलेचे देखील स्वब घेण्यात आले होते.ते आज पॉझिटिव्ह आले आहेत. या महिलेस जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
आजपर्यंत एरंडोल तालुक्यातील ग्रामीण भागात तीन रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यातील एक रुग्ण निगेटिव्ह आल्याने ग्रामीण भागाची रुग्ण संख्या २ झालेली असुन एक रुग्ण मुंबई येथे उपचार घेत आहे.तर शहरातील रुग्ण संख्या १२ झाली आहे.


Protected Content

Play sound