Home Uncategorized पाकिस्तानचा भारतावर हल्ला; एक भारतीय पायलट बेपत्ता

पाकिस्तानचा भारतावर हल्ला; एक भारतीय पायलट बेपत्ता


Raveesh Kumar

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानी हवाई दलाने आज सकाळी भारतीय सैन्य तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने मान्य केले आहे. त्याचवेळी हा हल्ला परतवून लावताना भारताचे एक मिग-२१ विमान कोसळले असून त्यातील दोन पैकी एक पायलट बेपत्ता असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.

त्याआधी भारतीय हद्दीत घुसलेल्या तीन पैकी एका एफ-१६ विमानाला भारतीय मिग-२१ बायसन विमानाने पाडले असून ते विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले आहे. त्याचवेळी भारताचे विमानही तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आहे. त्यातील एक पायलट बेपत्ता आहे. त्याचवेळी पाकिस्ताननेही दोन भारतीय पायलट पकडल्याचा दावा केला आहे. मात्र त्याबद्दल भारताला अजून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती पाकिस्तानकडून देण्यात आलेली नाही. भारतीय सैन्याकडून या दाव्याबाबत तपासणी करण्यात येत आहे, असेही विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound