भुसावळ बाजारपेठेत हातगाड्यांवर कारवाई ; मुख्याधिकारी डहाळे यांची माहिती

 

भुसावळ, प्रतिनिधी | आज शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे लावलेल्या हातगाडी विक्रेत्यांवर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व त्यांच्या पथकाने धडक कारवाई करत अनेक हातगाड्या जप्त केलेल्या आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बाजारपेठेतील दुकानांना सशर्तपणे दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यानंतर काही हातगाडी विक्रेत्यांनी बेशिस्तपणे गर्दी करून हातगाड्या लावलेल्या होत्या. हातगाड्यांवर कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता ग्राहकांची गर्दी दिसून आली होती. त्यामुळे भुसावळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व त्यांच्या पथकाने बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या सहकार्याने मुख्य बाजारपेठेतील विक्रेत्यांवर कारवाई करत अनेक हातगाड्या जप्त केलेल्या आहे. तसेच अशी कारवाई यापुढेही सतत चालू राहील तरी हातगाडीवरील विक्रेत्यांनी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून यापुढे बाजारात खरेदी करावी असे आवाहन मुख्याधिकारी करूणा डहाळे यांनी केले आहे.

Protected Content