शेवटच्या शेतकऱ्याचा मका खरेदी करे पर्यंत मका खरेदी ; ऍड. रविंद्र पाटील यांची ग्वाही

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी | येथे आज शासकीय मका खरेदी केंद्रा केंद्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे माजी सदस्य मा.ऍड.रवींद्रभैय्या पाटील व जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.रविंद्र प्रल्हादराव पाटील यांनी शासनाच्या मका, ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून शेंदुर्णी जिनिंग-प्रेसिंग सोसायटी प्रांगणामध्ये ऍड. रवींद्र भैय्या पाटील आणि तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते मका पोत्याचे विधिवत पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. पाटील यांनी सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे पणे उभे असून राज्यातील प्रत्येक घटकातील नागरिकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेंदूर्णी मका खरेदी केंद्राला गती मिळाली होती. परंतु कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने उशीर झाला. परंतु, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून संजय गरुड यांनी शेंदुर्णी येथील मका खरेदी केंद्राबाबत सांगितले. त्यानुसार नामदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्वरित मंजुरी देत मका खरेदी केंद्राची परवानगी मिळाली. शेवटच्या शेतकऱ्याचा मका खरेदी करे पर्यंत मका खरेदी सुरु राहणार आहे. तसेच बारदानच्या तुटवड्यामुळे मका खरेदी केंद्रामध्ये बाधा येऊ नये म्हणून तहसीलदार शेवाळे यांनी रेशनचे रिकामे झालेले बारदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर संजय गरुड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात दिशाभूल करणाऱ्या विरोधकांच्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, विजय काबरा, शेंदूर्णी जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन दगडू विष्णू पाटील, व्हाईस चेअरमन नंदकिशोर बारी, संचालक कैलास पाटील, अशोक चौधरी, गोपाळ गरुड, राजेंद्र पवार, दत्तात्रय पाटील, युवराज पाटील, भास्कर पाटील, उत्तमराव थोरात, अशोक आवटे, शामराव सावळे, अरुण घोलप, सिताराम पाटील, सावजी चांभार, भागवत पाटील, सचिव ज्ञानेश्वर पाटील,शांताराम दांडगे ,वसंत पाटील व शेतकरी उपस्थित होते.

Protected Content