रावेर तालुक्यात रेशन कार्ड नसले तरी मिळणार धान्य

 

रावेर, प्रतिनिधी | ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही तालुक्या बाहेरील आहे पण लॉकडाऊनमुळे इथेच अडकुन पडले आहे असे कुटुंब मोल-मजूर करणाऱ्यांसाठी रावेर महसूलकडून सुखद बातमी आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच त्यांना धान्य मिळणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून मिळाली आहे.

याबाबत वृत्त असे की, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अश्या कुटुंबासाठी शासनाकडून आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत ५ किलो  तांदुळ व एक किलो चना पुरवठा केला जाणार आहे. अश्या कुटुंबाना मे व जून अश्या महिन्यांचे धान्य पुरवले जाईल. परंतु, शासकीय गोडाऊनवर फक्त तांदूळ प्राप्त झाले असून चना प्राप्त होण्याचा अजुन बाकी आहे. त्यामुळे जून महिन्यात मे महिन्यांचे धान्य चना प्राप्त झाल्यावर वाटप केले जाणार आहे. रावेर तालुक्यातील किंवा बाहेरी असलेले परंतु लॉकडाउन इकडेच अडकुन पडले आहे अशांना याचा लाभ घेत येणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Protected Content