…आता पुनश्‍च हरी ओम ! : उध्दव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनचा बाऊ न करता आता नव्याने आयुष्य सुरू करायचे असल्याचे नमूद करत आता पुनश्‍च हरी ओम करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतांना बोलत होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, लॉकडाऊनचा आता बाऊ करण्यात कारण नाही. यामुळे लॉकडाऊनला दूर सारत नव्याने आयुष्य सुरू करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने सायंकाळीच लॉकडाऊन शिथील करतांना दिलेल्या नियमांची त्यांनी माहिती दिली. ठाकरे म्हणाले की, ३ जूनपासून लॉकडाऊन शिथील करण्यास प्रारंभ होणार असून ५ जूनपासून याला गती येणार आहे. राज्य सरकारने सार्वजनीक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. सर्व दुकानांना सम आणि विषम या प्रमाणात उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर ८ तारखेपासून सर्व कार्यालये सुरू होणार आहेत. बाहेर पडतांना मास्क लावण्यासह फिजीकल डिस्टन्सींग आवश्यक असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये पश्‍चीम किनारपट्टीवर येत्या चार दिवसांमध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

दरम्यान, उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील ६५ हजार कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमधून २८ हजारांच्या आसपास रूग्ण घरी होऊन परतले आहेत. तर ३४ हजार रूग्णांना कोणत्याही प्रकारची चिन्हे नसून ते विलगीकरणात राहत आहेत. आजवर १२०० जणांचा मृत्यू झाला असून दोनशे रूग्ण हे व्हेंटीलेटरवर आहेत. हे आकडे राज्यातील स्थिती ही नियंत्रणात असल्याचे दर्शविणारे ठरले आहेत. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात आधी दोन कोरोना प्रयोगशाळा होत्या. आज त्या ७७ असून लवकरच १०० होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यामुळे चाचण्यांची क्षमता देखील वाढलेली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, विद्यार्थ्यांना सेमिस्टरची सरासरी करून अंतीम गुणपत्रीका देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर कुणा विद्यार्थ्यांला आपण अजून गुण मिळवू शकू असा आत्मविश्‍वास असेल तर सप्टेबर वा त्यानंतर तशी संधी मिळणार असल्याची माहिती देखील उध्दव ठाकरे यांनी केली. ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. आगामी काळात आरोग्य, शिक्षण आदींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. आता खबरदारी आणि जबाबदारी ही एकत्रीतपणे राहणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Protected Content