पाल परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; घरावर झाड कोसळले : नवती केळीचे नुकसान

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी पट्टा असलेल्या पाल परिसरात अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून या वादळी पावसामुळे एका घरावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे त्या घराची कौले तुटून घराची पडझड झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सुत्रांनी कळविले.

दरम्यान, या अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली असून नवती पिकाचे नुकसान झाले आहे .शेतकरी चिंतेत सापडले असून चांगले फुललेला केळीचा मळा पूर्णतः लयास गेला आहे . पाल , लालमाती , सहस्रलिंग आणि परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी पिकांची लागवड केली आहे .आधीच पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. दरम्यान हा पाऊस दोन ते अडीच तास सुरू होता.

Protected Content