अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाप्रकरणातील १२ जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजकमल चौक परिसरात २७ मे रोजी अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करत असतांना ३० ते ३५ फळविक्रेत्यांनी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना आज घडली होती. शनीपेठ पोलीसात फळविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील १२ फळविक्रेत्यांना शनीपेठ पोलिसांनी आज अटक केली आहे.

काय आहे हा प्रकार?
गुरूवारी २७ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राजकमल चौकातील भंगाळे गोल्ड शॉपजवळ अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. अतिक्रमण असलेल्या वाहनांवर कारवाई करत आसतांना पालिका कर्मचारी दिपक चंद्रकांत कोळी यांच्यावर ३० ते ३५ फळविक्रेत्यांनी दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला होता. यात कर्मचारी दिपक कोळी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात फळविक्रेत्यांवर जीवघेणा हल्लाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच शनी पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही.डी. ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फैजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सलीम पिंजारी, हकीम शेख, रवींद्र पवार, रवींद्र पाटील, परीस जाधव, अभिजित सैन्दने, मुकुंद गंगावणे यांनी कारवाई करत फळविक्रेते संशयित आरोपी मोहम्मद रेहान मोहम्मद आजम बागवान (वय-२१), मो.युसूफ मो. शकील बागवान (वय-३२), मो. शकील मो.अब्दुल बागवान (वय-५७), मो.सईद मो.शकील बागवान (वय-३०), मो.ताहेर मो. याकुब बागवान (वय-२९), मो. मुज्मील अब्दुल अझीझ बागवान (वय-२६) सर्व रा. बागवान मोहल्ला, जोशी पेठ, मो.रियाज हाजी युसुफ बागवान (वय-३९), मो.दानिश मो.नासिर (वय-२३) दोन्हा रा. भवानी पेठ, मो. सलीम अब्दुल रहेमान बागवान (वय-४९) रा. शाहु नगर, मो.मोहसिन उर्फ अशपाक शेख इस्माईल बागवान (वय-२८) रा.रथगल्ली जोशी पेठ, शाहरूख मो. सलीम (वय-२२) रा. सलार नगर, मो. शोएब सईद बागवान (वय-२५), रा. भंगारगल्ली जोशी पेठ यांनी अटक केली आहे. सर्वांवर सरकारी कामात अडथळा, लॉकडाऊनचे उल्लंघन, जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content