मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर ही वेळ आली नसती : अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.

 

केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. शाह म्हणाले, दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे मला वाटतं की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती. दरम्यान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सरकारने कोरोनाचा फैलाव मरकजच्या कार्यक्रमाला झाल्याचा आरोप केला होता.

Protected Content