धक्कादायक : क्वारंटाईन सेंटरमध्ये एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा हार्टअॅटकने मृत्यू

चंद्रपूर (वृत्तसंस्था) चंद्रपूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सेंटरमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्याचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिथुन सरकार असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. तर ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष निकोडे असे आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेला मजूर हा 7 दिवसांपूर्वी नागपूरहून आला होता. तर हार्टअॅटकने मृत्यू झालेला व्यक्ती सात दिवसांपासून क्वारंटाईन केंद्रात दाखल होता. हा व्यक्ती मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Protected Content