Home क्राईम घरासमोर लावलेली दुचाकी लंपास; चोरट्यांविरोधात गुन्हा

घरासमोर लावलेली दुचाकी लंपास; चोरट्यांविरोधात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । कामावरून घरी आल्यानंतर घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, महेंद्र अमत पाटील (वय-४५) रा. प्लॉट नं. २१ शिवकॉलनी, जळगाव हे रेमंड कंपनीत नोकरीला आहे. २६ मे २०२० रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कामावरून घरी आले. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएम ९०९७) घरासमोर पार्किंग करून लावली होती. त्यानंतर जेवण करून झोपले. २७ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास महेंद्र पाटील यांच्या वडीलांना शेतात पथराड ता. धरणगाव येथे जेवणाचा डाबा देण्यासाठी दुचाकीजवळ गेले असता त्यांनी पार्किंग केलेली दुचाकी मिळून आली नाही. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी इतरत्र शोधाशोध सुरू केला. दुचाकी चोरीस गेल्या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound