पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन

चाळीसगाव प्रतिनिधी । पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी जयंती असल्याने सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश बांधवांनी जयंती उत्सव घरात बसून साजरी करावी असे आवाहन अहिल्यादेवी होळकर प्रेमी मंडळी व धनगर समाज बांधवांना केले आहे.

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती रविवार ३१ मे २०२० रविवारी सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. यंदा हा जयंती महोत्सव कोरोना या साथीच्या आजारांमुळे सर्वांना एकत्र येऊन साजरा करता येणार नाही. संपूर्ण देश बांधवांसाठी यंदा हा जयंती उत्सव सण आपापल्या घरी कुटुंबासह घरीच साजरा करावा लागणार आहे. यादिवशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पअर्पण करून कुटुंबासमवेत पूजन करावे. समतेचे प्रतीक पिवळे निशाण अथवा होळकरांचे निशाण घर, इमारत अथवा अंगणात फडकवावे. अनेक वर्षापासून सुरू असलेला हा जयंती महोत्सव अखंडितपणे साजरा करण्यासाठी प्रत्येकाने करोना या साथीच्या आजारांमुळे सर्वांनी एकत्र न येता आपापल्या घरी परिवारासह साजरा करावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष पोपट आगोणे, सचिव रमेश जानराव यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सदस्य यांनी अहिल्यादेवी होळकर प्रेमी मंडळी व धनगर समाज बांधवांना केले आहे.

Protected Content