Home Cities जळगाव अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजुंना किराणा वाटप

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजुंना किराणा वाटप

0
37

 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोरगरिब कुटुंबाना किराणा व मास्कचे वाटप करण्यात आले.

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत रोजगार बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्यांना उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. अशाच रामेश्वर कॉलनीतल्या गरजू १०० कुटुंबना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किराणा व मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अनुताई कोळी, एस. एम. ग्रुपचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनवणे, निलूताई इंगळे, विभाग अध्यक्ष संदिप मांडोळे, महानगर सरचिटणीस अविनाश पाटील, बबलूभाई शेख, लियाकत खान आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound