Home Cities जळगाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३७ वी जयंती भाजप जिल्हा महानगरातर्फे साजरी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३७ वी जयंती भाजप जिल्हा महानगरातर्फे साजरी

0
43


जळगाव, प्रतिनिधी ।  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वि जयंती यांची जयंती आज २८ मे रोजी भाजप जिल्हा महानगराच्या वतीने साजरी करण्यात आली.

स्वातंत्र्यचौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला १३७ व्या जयंतीनिमित्ताने माल्यार्पण व पुष्पार्पण आ. राजूमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर अमर रहे, भारत माता , वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी भाजप माजी अध्यक्ष सुभाष सौचे, जिल्हा पदाधिकारी राजू मराठे, राहुल वाघ, मनोज भांडारकर, संजय शिंदे , संजय भावसार, जयदीप शहा, वीर सावरकर रिक्षा युनियानचे दिलीप सपकाळे व त्यांचे सहकारी,पत्रकार चंदू नेवे इत्यादी उपस्थित होते.


Protected Content

Play sound