जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअरच्या वतीने आज येथे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअरच्या वतीने फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.
आज जळगाव महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना १००० फेस शिल्डचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअरतर्फे करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी युवकचे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त पवन पाटील तसेच आरोग्य अधिकारी विकास पाटील व इतर महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.