Home आरोग्य पारोळ्यात आढळला एक कोरोना बाधीत

पारोळ्यात आढळला एक कोरोना बाधीत

0
36

जळगाव प्रतिनिधी । आजवर कमी संसर्ग असणार्‍या पारोळ्या तालुक्यात रूग्ण संख्या वाढत असून आज येथे पुन्हा एक नवीन रूग्ण आढळून आला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री कोरोनाचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की, आता पारोळा व एरंडोल येथील ५९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५८ अहवाल निगेटिव्ह तर १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती पारोळा येथील आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५२३ झाली आहे. त्यापैकी २१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound