बाधित पोलीसाच्या संपर्कात आलेल्या पहूर परीसरातील चौघांचे अहवाल निगेटिव्ह

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जळगाव येथील बाधित पोलीस कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या पहूर येधील दोन, रोटवद व जंगीपुरा येथील प्रत्येकी एक असे एकूण चार जणांचा स्वॅब घेतले असून यातील चौघांना अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

जळगावच्या कोरोना बाधीत पोलीसाच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे येथील ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले होते. यातील चार स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी दिली आहे. तर पाळधी येथील आठ व दोंदवाडे येथील पाच जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ . जितेंद्र वानखेडे, डॉ . संदिप कुमावत , डॉ . सचिन वाघ , डॉ . पुष्कराज नारखेडे यांच्यासह परीचारीका व आरोग्य कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

पहूर येथील दोन, रोटवद व जंगीपुरा येथील प्रत्येकी एक असे एकूण चारही जणांना खबरदारीचा उपाय म्हणुन पहूर येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी सांगितले आहे.
यामुळे पहूर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Protected Content